HW News Marathi
महाराष्ट्र

ढोल वाजवून सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करु

पंढरपूर | मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आरक्षणाच्या या मागणीनंतर आता धनगर समाज बांधवानी देखील आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी आज (२५ सप्टेंबर) पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येत आहे.

ढोल वाजवून जर सरकारला जाग आली नाही, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. दरम्यान,सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये धनगर बांधव ढोल वादन करत मोर्चा काढत आहेत.

धनगर आंदोलन राज्यभर विविध ठिकाणी होत आहे. राज्यभरातील ग्रामपंचायत, नगर पालिका , मंदिर , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होईल, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. मी स्वतः पंढरपूर येथे आंदोलनात सहभागी होत आहे, असं पडळकर म्हणाले. त्यामूळे सरकार मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजाच्याही मागण्या पुर्ण करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू! – सुप्रिया सुळे

Aprna

अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे – संजय राऊत

News Desk

विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत सरकारने १ वर्ष पुर्ण केले!

News Desk