HW News Marathi
महाराष्ट्र

Raj Thackeray ED Case | चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही !

मुंबई | “ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही”, असे विधान राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, “इतिहास पाहता ज्यांची ज्यांची ईडीकडून चौकशी झाली त्या सर्वांनाच अटक झाली असे घडले नाही”, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. कोहिनूर मिल प्रकरणी गेल्या ३ दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे, दीपक केसरकर यांनी या पार्श्वभूमीवर सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

“राज ठाकरे हे या चौकशीला संयमाने सामोरे गेले असून योग्य ते सहकार्य करत आहेत. राज यांनी आपल्या समर्थकांना देखील शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई शहर मोठे असल्याने कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोणावरही दडपशाही करण्याचा हेतू नाही. मात्र, खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज ठाकरेंच्या यांच्या ईडीच्या चौकशीतून जर काही निष्पन्न झाले नाही तर लोक हे प्रकरण विसरुन देखील जातील”, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात आल्यानंतर मनसैनिकांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णकुंज’ या राज यांच्या निवासस्थानाच्या परिसरासह दक्षिण मुंबईत पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ईडी कार्यालयाच्या परिसरात देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डींचे निलंबन

News Desk

सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला – सामना

News Desk

सेना-भाजप एकत्र आल्यास नवल वाटू नये!, भाजप नेत्याचं मोठं विधान

News Desk