HW News Marathi
महाराष्ट्र

खाणीच्या खोदकामात आढळली प्राचीन मुर्ती

बीड | परळीच्या अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळील असलेल्या जलालपूर शिवारात जेसीबी मशिनने खाणीचे खोदकाम सुरु होते. त्या ठिकाणी अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली असून त्या मूर्तीजवळ नाग बसलेला पहायला मिळाला.

खाणीच्या कामा दरम्यान आढळून आलेली मुर्ती आणि त्या जवळ बसलेला नाग पाहण्यासाठी व त्या मुर्ती हे दर्शन घेण्यासाठी परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती. काही लोकांनी तर त्या मूर्तीची हळद-कुंकू वाहून अगरबत्ती पेटवून पूजन केले. ही बातमी समजताच आसपासच्या गावातील पसरातील लोकांच्या रांगा याठिकाणी लागल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

तहसीलदार शरद झाडके यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले की, आपण बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून पुरातत्व खात्याला ही मूर्ती तपासणीसाठी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी बघ्यांची गर्दी वाढत आहे परंतु त्या मुर्तीला हात न लावता दर्शन घ्यावे. ज्यामुळे या मूर्तीच्या भग्नावशेषातून मूर्तीचा इतिहास पुरातत्व खात्याला सहजपणे काढता येईल असे आवाहन तहसीलदार झाडके यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk

यंदाचं नागपूरमधील हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार?

News Desk

विमानातल्या प्रवाशाची बिघडली तब्येत, अन् केंद्रीय मंत्री भागवत कराडांच मोदींनीही केलं कौतुक!

News Desk