HW News Marathi
महाराष्ट्र

…तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल !

नागपूर | “काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश असेच सुरु राहिले तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल”, अशी बोचरी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठया प्रमाणावर शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या भाजपप्रवेशांमुळे जितकी काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे तितकीच नाराजी भाजपमध्ये देखील दिसत आहे.

“राज्यात सध्या विराेधी पक्षाचे अस्तित्वच उरलेले नाही. रासपचे राज्यात ९८ जिल्हा परिषद सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपनगराध्यक्ष, २ आमदार आहेत. म्हणून यंदाच्या विधानसभेसाठी रासपने भाजपकडे ५७ जागांची मागणी केली आहे”, अशी माहिती देखील यावेळी महादेव जानकर यांनी दिली आहे. तर येत्या २५ ऑगस्टला मुंबईत पार पडणाऱ्या रासपच्या वर्धापन दिन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.

भाजपमध्ये सुरु असलेल्या या जोरदार इनकमिंगवरून महादेव यांच्याचसारखी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. “भाजपचे काँग्रेसीकरण सुरु झाले आहे. आम्ही मोठे केलेले नेते भाजप पळवत आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. “तर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या पक्षप्रवेशांवरून भाजपला घरचा आहेर दिला आहे. “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची निष्ठा तपासा अन्यथा निष्ठावंतांवर अन्याय होईल. ते भाजपमध्ये येतील आणि आपल्याचविरोधात काम करतील”, अशी चिंता एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!

News Desk

राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा उपलब्ध करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दावा

News Desk

शिवसेनेची ‘जन आशीर्वाद’ यात्रा स्थगित

News Desk