HW News Marathi
देश / विदेश

प्रियांका गांधी कँडल मार्चमध्ये कार्यकर्त्यांवर भडकल्या

नवी दिल्ली | ‘गोंधळ घालयचा असेल तर सरळ घरी जा,’ अशा शब्दात प्रियांका गांधी कार्यकर्त्यांवर भडलकल्या. कठुआ आणि उन्नाव या दोन्ही बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस मुख्यलयापासून इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला होता.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी राहुल गांधी यांनी कँडल मार्चच्या माध्यमातून सरकारकडे केली. कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांका गांधी आल्या होत्या. त्यानंतर प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फ काढण्यासाठी कार्यकर्ते धडपड करत होते. तेव्हा हा मोर्चा मागचा उद्देश लक्ष्यात घ्या, असे ही प्रियांका गांधी कार्यकर्त्यांना म्हणाल्या. पण, कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबत नव्हता. या मार्चमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी बहुसंख्य लोकांनी सहभाग नोंदवला.

भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनी उन्नावमध्ये १६ वर्षीय तरुणीवर साहमुहिक बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर दुसरीकडे कठुआमध्ये ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर साहमुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ओडिशानंतर आता ‘या’ राज्यातही १ मेपर्यंत लॉकडाऊन

News Desk

या मराठमोळ्या शिल्पकाराने घडविले स्टॅच्यू ऑफ युनिटी

Gauri Tilekar

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी!

News Desk
राजकारण

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणुक झाल्यानंतर रंगलेले राजकीय नाट्य त्यानंतर कॉंग्रेस जेडिएसचे संयुक्त सरकार सत्तेत आल्यानंतर कुमारस्वामींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली परंतु विधानसभेत शुक्रवारी कुमारस्वामी सरकारने ख-या अर्थाने बहुमत सिद्ध केले. येडियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध केले आहे.

येडियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस – जेडीएस आणि बसपाच्या एकूण ११७ आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. भाजपाचे सरकार अवघ्या ५५ तासाच कोळसल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. बुधवारी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. कर्नाटक विधानसभेत १०४ आमदारांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. पण बहुमतांसाठी आवश्यक ११२ आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यामुळे येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ आमदार आहेत.

दरम्यान बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Related posts

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; वैद्यकीय तपासणीला परवानगी

Aprna

आज भाजपचे उपोषण

News Desk

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

News Desk