HW News Marathi
महाराष्ट्र

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला…

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेले भाजपचे सरकार ३ दिवसात कोसळले होते. या तीन दिवसांच्या सरकारवरून आणि पहाटेच्या शपथविधीवरुन शिवसेनेने आजच्या (२१ सप्टेंबर) अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे. शिवसेनेने केलेल्या या टीकेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला उत्तर दिले आहे.

“शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार हे पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला,” असे उत्तर निलेश राणेंनी यांनी शिवसेनेला दिले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

“सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले. फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले,” असं म्हणत शिवसेनेनं काही पोलीस अधिकाऱ्यांना टोला लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk

चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह त्याचे वाटप

News Desk

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, जीवितहानी नाही

News Desk