HW News Marathi
मनोरंजन

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना

नवी दिल्ली | देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण करून लाल किल्ल्यावरुन देशातील जनतेला संबोधित केले. या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशातील संरक्षण दलासंबंधी मोठी घोषणा केली आहे. देशातील तिन्ही संरक्षण दलांमध्ये अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी आता ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची नव्याने स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान दिली आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ देशातील तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय राखणायचे काम करेल. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ समितीत तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. त्यांपैकी वरिष्ठ सदस्याकडे समितीचे चेअरमनपद दिले जाते.

पंतप्रधान मोदींनी याबाबतचे ट्विट देखील केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी शांती आणि सुरक्षा अनिवार्य आहे. अनेक जण दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. देश सध्या दहशतवादाविरुद्ध तसेच दहशतवादाला पोसणाऱ्यांविरुद्ध मोठा लढा देत आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणावर साधला आहे. केवळ भारत नव्हे तर बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंकेसारखे देशही सध्या दहशतवादासारख्या भीषण समस्येचा सामना करत आहे. देशातील तिन्ही संरक्षण दलांमध्ये एक प्रकारचे समन्वय असणे आवश्यक आहे. ते समन्वय राखण्यासाठी तिन्ही संरक्षण दलावर एक प्रभारी नेमण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची नव्याने स्थापना करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद निर्माण करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रिया सोशल मिडीयावर का होतेय व्हायरलं…

News Desk

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

Aprna

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला!

Aprna