मुंबई | राज्यातील कोरोनाधितांचा तासागणिक वाढत जाणारा आकडा आपली चिंता वाढवत आहे. राज्यात आज (२० एप्रिल) तब्बल ४६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर या ४६६ पैकी ३०८ नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ४,६६६ इतका झाला आहे. तर एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३,०३२ इतका झाला आहे. राज्यात प्रथम मुंबईला आणि त्यानंतर पुण्याला कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. त्यातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टी हे कोरोनाचे केंद्र बनली आहे. धारावीत ३० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आता धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६८ वर पोहोचला आहे.
30 new #Coronavirus positive cases reported today in Dharavi. The total number of positive cases in the area increases to 168 (including 11 deaths): Brihanmumbai Municipal Corporation (BMC). #Mumbai pic.twitter.com/g9paEWRUvI
— ANI (@ANI) April 20, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.