HW News Marathi
मुंबई

दोन दिवस धावपट्टी बंद

मुंबई | मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी 9 एप्रिल आणि १० एप्रिल रोजी दररोज सहा तास धावपट्टी बंद ठेवण्याचे निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामुळे सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. यावेळेत येणा-या विमानांच्या वेळेत बदल करून वेळा बदलून त्या दुस-या स्लॉटमध्ये देण्यात आल्या आहेत.

मुंबईत विमानतळाच्या धावपट्टीचे काम करण्यात येत असल्याने 8 व 9 एप्रिल रोजीचे औरंगाबाद येथून दिल्ली येथे जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या विमानांसह औरंगाबाद ते मुंबई तसेच मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांनाही दोन दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुस-या क्रमांकाचे अत्यंत वर्दळीचे विमातळ आहे. प्राथमिक धावपट्टी दर तासाला 48 विमाने तर व्दितीय धावपट्टीवर प्रति तास 35 विमानांचे उड्डान होते. सरासरी दररोज या विमानतळामध्ये 9 70 विमानांचे आगमन आणि उड्डान होते. पावसाळ्यानंतर विमान तळाच्या देखभालीसाठी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत धावपट्टी पुन्हा एकदा बंद ठेवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संविधानाची प्रत जळणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात लोककलावतांचा निषेध मोर्चा

News Desk

मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून संप

News Desk

बचावासाठी डॉक्टरांची “डोकॅलिटी”

News Desk
मुंबई

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू

News Desk

मुंबई | निष्काळजी आणि चुकीच्या उपचारामुळे सर जे. जे. रुग्णालयाने आपल्या २२ महिन्यांच्या मुलाची हत्या केली, असा आरोप वाळीव पोलीस ठाण्यात कार्यरत वसीम शेख (३३) यांनी रविवारी केला. तशी तक्रार त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात केली. श्वानदंश झालेला नसताना रेबीजची लक्षणे या निव्वळ अंदाजावर उपचार केल्याचा दावा शेख कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात २६ मार्चच्या रात्री शेख आणि कुटुंबाने २२ महिन्यांच्या अझान याला जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शेख यांनी ‘आमचे प्रतिनिधी’ आणि पोलीस ठाण्याकडे दिलेल्या जबाबानुसार, २८ मार्चला संध्याकाळी एक महिला शिकाऊ डॉक्टर अझानच्या थुंकीचा नमुना घेत असताना व्हेंटिलेटरवरील अझानच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. साडेतीन तासांनी तातडीने रक्ताची व्यवस्था करा, असे सांगण्यात आले.

त्यानुसार रक्ताची जुळवाजुळव केली. महिला डॉक्टरने अझान पुढले जेमतेम दोन दिवस जगू शकेल, त्याची प्रकृती नाजूक आहे, असे सांगितले. ३० मार्चला मणक्यातील पाण्याचे आणि अन्य नमुने, आवश्यक ती कागदपत्रे हाती देत जे.जे.तील डॉक्टरांनी याची चाचणी बंगळूरु येथील निम्हंस रुग्णालयात करावी लागेल, असे सांगितले. तेथील चाचणीत अझानला रेबीज नसल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला.

रविवारी मध्यरात्री एक ते पहाटे चार यावेळेत वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने अझानचा व्हेंटिलेटर सहा ते सात वेळा बाजूला करून नैसर्गिकरीत्या उपचार करण्याचे प्रयत्न केले. अखेर चारच्या सुमारास त्यांनी अझानचा मृत्यू ओढवल्याचे आम्हाला कळवले, असे वसीम यांनी सांगितले.

Related posts

निसर्गाने लादलेल्या अंधत्वावर मात करत फोडली दहीहंडी

News Desk

तारापोरवाला मत्स्यालयातील आजारी कासवाचे मुंबईकरांना दर्शन

News Desk

ते नगरसेवक छक्के….

News Desk