HW News Marathi
देश / विदेश

रामदास आठवलेंच्या सुरक्षेत वाढ करा

सुरत | काँग्रेसची सुरत मधील ही काळी कर्तुत असल्याची टीका रिपाइंचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी यांनी केली आहे. या दलित तरुणास मोठी रक्कमेची सुपारी देऊन काळा झेंडा दाखविण्यासाठी काँग्रेस ने पाठविले असल्याचा आरोप करीत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी अशोक भट्टी यांनी केली आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याची जेंव्हा जेंव्हा वेळ आली तेंव्हा काँग्रेसच्या सरकारने महामानवाच्या गौरवाबद्दल नकारात्मक भूमिका घेतली आहे. ही काँग्रेसची काळी बाजू दलितांसमोर उघडी होत असल्यामुळे काँग्रेस पक्षाने भाजप रिपाइं युतीविरुद्ध दलित तरुणांना भडकविण्याचे हीन राजकारण सुरू केले आहे. त्यामुळेच सुरतमध्ये रामदास आठवलेंच्या पत्रकार परिषदेत एका तरुणास काळा झेंडा घेऊन पाठविण्याची काळी कर्तुत काँग्रेसने केली आहे. असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी यांनी केला आहे.

सुरत मध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहिले होते. त्यावेळीहजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनता उपस्थित होती. डॉ आंबेडकरांनी दिलेल्या राष्ट्र उभारणीतील योगदानाचा गौरव भाजप रिपाइं युतीच्या प्रयत्नामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएचे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात करीत असल्याबद्दल आंबेडकरी जनतेचा पाठिंबा दिसून आला.

एनडीएचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाने देशभरात काँग्रेसच्या बेगडी दलितप्रेमाचा बुरखा फाडला आहे. भाजप ची कोंडी फोडत मोठया प्रमाणात देशभर आंबेडकरी जनतेचे समर्थन भाजपला मिळवून देण्याच्या केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीने काँग्रेसचे पित्त खवळले आहे. त्यामुळे जाहीर कार्यक्रमातुन आंबेडकरी जनतेचा जाहीर भरघोस पाठिंबा रिपाइं ला मिळत असल्याचा जळफळाट झालेल्या काँग्रेसने केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून एका तरुणास केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या पत्रकार परिषदेत काळा झेंडा घेऊन पाठविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे निधन, राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली 

News Desk

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार ?

News Desk

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १२२ वर

News Desk