HW News Marathi
राजकारण

शर्मिला ठाकरे आज करणार पुरग्रस्त भागाचा दौरा

मुंबई | सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात सतत परडणाऱ्या पावसामुळे पूर आल्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यापूराचे पाणी घरात शिरल्यामुळे असंख्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारबरोबरच विविध सामाजिक संस्था पूरग्रस्त भागाच्या विकासाठी मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आज (१४ ऑगस्ट) पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यात त्या सर्वप्रथम सकाळी ११ वाजता पुराची सर्वात जास्त झळ बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देणार आहेत. दुपारी २ वाजता सांगलीतल्या पूरबाधित लोकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन जनावरांच्या छावणीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ५ वाजता त्या कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत.

कोल्हापुरातल्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतल्या पूरबाधित लोकांची संध्याकाळी ६ वाजता भेट घेणार आहेत. कोल्हापुरातल्या पुराची पाहणी करून झाल्यानंतर त्या साताऱ्याकडे मार्गस्थ होणार आहेत, साताऱ्या पोहोचल्यानंतर तिथेही त्या पूरग्रस्त लोकांना भेट देऊन त्यांना मदत करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

News Desk

शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल

News Desk

बावनकुळे आमचा हिरा, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

News Desk