नवी दिल्ली | मुंबई, दिल्लीसह देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान, देशाच्या सीमारेषेवर तैनात जवान देखील ईद साजरी करतात. या दिवशी भारतीय जवान आणि पाकिस्तानी जवान एकमेकांना मिठाई देऊन, शुभेच्छा देत ईद साजरी करतात. त्याप्रमाणे, यंदाही ईदनिमित्ताने वाघा-अटारी बॉर्डरवर तैनात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांना मिठाई देऊ केली. मात्र, पाकिस्तानी जवानांकडून ही मिठाई नाकारण्यात आली. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर आज (१२ ऑगस्ट) प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईद साजरी केली जात आहे.
On the occasion of #EidAlAdha, Border Security Force(BSF) exchanged sweets with Border Guards Bangladesh (BGB) at Fulbari at Indo-Bangladesh border, today. pic.twitter.com/xVr9FxGmaN
— ANI (@ANI) August 12, 2019
केंद्राचा कलम ३७० रद्द करण्याचा हा निर्णय सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळेच पाकिस्तानने अशी आडमुठी भूमिका घेतली असावी. मात्र,पाकिस्तानने जरी अशी आडमुठी भूमिका घेतली असली तरीही भारत-बांगलादेश सीमेवर मात्र मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली आहे. भारताचे बीएसएफ जवान आणि बॉर्डर गार्ड्स बांग्लादेशच्या जवानांनी एकमेकांना मिठाई देऊन, एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देत ईद साजरी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.