HW News Marathi
देश / विदेश

सलमान खानच्या जामीनावर उद्या सुनावणी

जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला शुक्रवारी सत्र न्यायालयात दिलासा मिळाला नाही. शुक्रवारी सलमानच्या जामिनावर सुनावणी करण्यात आली. परंतु त्यावर शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे सलमानला आणखी एक दिवस जेलमध्ये काढावा लागणार आहे.

सत्र न्यायालयात शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली. सलमानच्या वकीलांनी 51 पानांचा जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये 54 मुद्द्यांवर त्याला जामीन मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती. उद्या यावर सुनावणी होणार आहे. यामुळे तूर्तास आजची रात्र सलमानला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढलीय ! आशिष शेलारांची जहरी टीका

News Desk

डोवाल यांनी काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवण करत केली चर्चा

News Desk

“जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?”,फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर  

News Desk