पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटांमुळे नागरीकांची जी वित्तहानी झाली आहे, त्यातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. राज्य सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे
महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि राज्य सरकार करीत असलेली मदत याची आज रात्री 9 पर्यंतची स्थिती
✔️कोल्हापूर, सांगलीतून 2,52,813 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले
✔️विविध संस्थांच्या 62 हून अधिक चमूंकडून मदतकार्य
✔️कोल्हापुरात 8, सांगलीत 4 तालुके बाधित#MaharashtraFloods #KolhapurFloods— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 9, 2019
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने आतापर्यंत राज्य सरकारने 154 कोटी रुपये जिल्हाधिकाृ-यांकडे वितरित करण्यासाठी दिले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडून देण्यात आली आहे.
✔️पूरग्रस्तांना मदतीसाठी 154 कोटींचा निधी जिल्हाधिकार्यांकडे
✔️आरोग्य विभागाची 70 पथके कार्यरत, लेप्टो, सर्पदंश यासाठी मुबलक औषधी साठा रवाना
✔️वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी 40 पथके#MaharashrtraFloods #sanglifloods #KolhapurFloods— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 9, 2019
बचावकार्यासाठी विशाखापट्टणम येथून नौदलाची १५ पथकं महाराष्ट्रात येणार
#MaharashrtraFloods updates:
Additional 15 teams of @indiannavy from Visakhapatnam to reach Kolhapur by this afternoon to assist rescue efforts.— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 10, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.