HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेबांचा ठाकरे ब्रॅंड जपायला राज ठाकरे समर्थ ! मनसेचा राऊतांना टोला

मुंबई | मुंबई विषयी अभिनेत्री कंगणा राणावत हीने अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर कंगणा विरूद्ध शिवसेना हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं.एकीककडे कंगणा मुंबईत आल्यानंतर शांत असणाऱ्या संजय राऊतांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरातून अत्यंत तिखट शब्दांत कंगणा आणि भाजपला सुनावले आहे .दुसरीकडे ‘महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा,ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल ‘ असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं आहे.राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, असं सांगत शिवसेनेने राज ठाकरेंना साद घातली आहे.

राऊतांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी थेट राज ठाकरेंना साद घातल्याने मनसे यावर काय प्रतिक्रिया देणार हे महत्वाचे होते. राऊतांना उत्तर देताना र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, पण ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे.

संदीप देशपांडे असंही म्हणाले की ,तर महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म…तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाही !

swarit

मेट्रो कारशेडबाबत खूल्या चर्चेला या!आदित्य ठाकरेंना भाजप नेते आशिष शेलार यांचे जाहीर आवाहन

News Desk

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk