मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतआहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या ३०८१ वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईमध्ये आज (१६ एप्रिल) १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे २३, अहमदनगर १, चंद्रपूर १, मालेगाव ४, नागपूर ११, नवी मुंबई २, पनवेल १, ठाणे १३ आणि वसई-विरार २, अशी एकूण १६५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजाराच्या पार गेली आहे.
165 more #COVID19 cases (including 107 in Mumbai) reported in Maharashtra today, taking the total number of coronavirus cases in the state to 3081: State Health Department pic.twitter.com/a1xpyzfyrX
— ANI (@ANI) April 16, 2020
दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल (१५ एप्रिल) ३५ टक्क्यांची घट झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील ट्वीट केले आहे. मुंबईत काल १४० नवे कोरोना रुग्णा आढळून आले असून २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत गेल्या ११ दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत ११४ मृत्यूची नोंद झाली आहे. पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या २००३ वर पोहचली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.