नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २.० सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यानंतर कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचे विधेयक सभागृहात ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी आजचा दिवस भारतीय लोकशाहीचा इतिहासाचा काळा दिवस म्हणत, त्यांच्या ट्वीटर हँडलवरून निषेध करत संतप्तजनक प्रतिक्रिया दिली आहे.
It will have catastrophic consequences for the subcontinent. GOIs intentions are clear. They want the territory of J&K by terrorising it’s people. India has failed Kashmir in keeping its promises.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 5, 2019
पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती म्हणाल्या की, “आज भारतीय लोकशाहीचा काळा दिवस आहे. १९४७ साली द्विराष्ट्र सिद्धांताला विरोध करत जम्मू-काश्मीरच्या जनतेने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे हा निर्णय बेकायदेशीर, एकतर्फी आणि असंवैधानिक असा आहे.”
मुफ्ती म्हणाल्या की, मी आधीच नजरकैदेत आहे. मला कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. अजून किती काळ मला संवाद साधता येणार नाही हे माहिती नाही. आज काश्मीरवर अन्याय होत असून ज्या भारताला आम्ही स्वीकारले तो हाच भारत आहे का ? असे सवाल देखील मुफ्ती यांनी विचारला आहे. मुफ्ती म्हणतात की, जम्मू-काश्मीरला विषेश दर्जा देणारे कलम ३७० हे रद्द करण्यात येणार म्हणून समाजातील अनेक घटक आनंद व्यक्त करत आहेत, ही बाब अत्यंत वाईट आणि निराशाजनक आहे.
The way some sections of media & civil society are celebrating these developments with glee is disgusting & disconcerting.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 5, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.