HW News Marathi
देश / विदेश

प्रिया मलिककडून सुवर्णपदकाची कमाई,जागतिक कुस्ती स्पर्धेत यश पटकावलं

हंगेरी। हंगेरी मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत कुस्तीपट्टू प्रिया मलिकला यश मिळालं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर प्रिया मलिकने मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे आनंद व्यक्त होत आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे.

अनेक विजेतेपदांची मानकरी

प्रिया मलिक हिने या आधीही अनेक विजेतेपद पटकावले आहेत. प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.

PV सिंधू विजयी

भारतीय बॅडमिंटणपट्टू PV सिंधू विजयी ठरली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २९ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसाममध्ये गोमांस विक्रीच्या संशयातून जमावाकडून एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण

News Desk

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल ! मुंबईसाठी राऊतांची साद

News Desk

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवादाचा ‘या’ विधानाने केला भावनिक शेवट

Aprna