मुंबई | येस बॅंकेच्या घोटाळ्यात अडकलेले वाधवान कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचा लॉकडाऊन असूनही वाधवान कुटुंब महाबळेश्वरला फिरायला गेले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना प्रवासाची परवानगी गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी पत्राद्वारे दिली होती. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तीच्या रजेवर तर पाठवले आहेच, पण त्यांचे पदही धोक्यात आले आहे. विरोधकांकडून गृहमंत्र्यांवर आणि ठाकरे सरकारवर आरोप होत आहेत.
विरोधी पक्ष नेते किरीट सोमैय्या यांनी अनिल देशमूखांना पदावरुन काढून टाकावे अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी वाधवान बंधू आणि अमिताभ गुप्ता यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.
I file criminal Complaint at mulund east police station, against Amitabh Gupta Home Secretary Maharashtra for protecting and honouring criminal absconders Wadhawan Brothers Demanded registration of FIR & arrest of Amitabh Gupta & Wadhawan Brothers @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/6Hf6XQxJlg
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 10, 2020
तसेच, वाधवान कुटुंबीयांचे असे प्रवास करणे हे ठाकरे सरकारमुळे झाले आहे.त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही किरीट सौमैय्या यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
#Wadhawan Brothers VVIP treatment scam by Thackeray Sarkar, Home Minister Anil Deshmukh should resign @BJP4Maharashtra @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.