मुंबई। राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (९ एप्रिल) दिली.
#CoronaVirusUpdate
आज नवीन २२९ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली १३६४. #कोरोना विषाणू बाधित १२५ रुग्ण बरे होऊन गेले घरी. सध्या ११४२ रुग्णांवर उपचार सुरू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती pic.twitter.com/9GTHT1sD5Z— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 9, 2020
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८हजार ८६५जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत १२५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
दरम्यान, आज राज्यात २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूंपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या
मुंबई- ८७६
पुणे मनपा – १८१
पिंपरी-चिंचवड – १९
पुणे ग्रामीण – ६
ठाणे मनपा – २६
कल्याण-डोंबिवली मनपा – ३२
नवी मुंबई मनपा – ३१
मीरा-भाईदर – ४
वसई-विरार मनपा – ११
पनवेल मनपा – ६
पालघर ग्रामीण – ३
ठाणे ग्रामीण – ३
सातारा – ६
सांगली – २६
नागपूर – १९
अहमदनगर – २५
बुलढाणा – ११
औरंगाबाद – १७
लातूर – ८
अकोला – ९
मालेगाव – ४
रत्नागिरी – ४
यवतमाळ – ४
उस्मानाबाद – ४
अमरावती – ४
कोल्हापूर – ५
उल्हासनगर मनपा – १
नाशिक – १
जळगाव -१
जालना – १
हिंगोली – १
वाशिम – १
गोंदिया – १
बीड – १
सिंधुदुर्ग – १
इतर राज्य – ८
एकूण – १३६४
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.