HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना UPAचं अध्यक्ष करा आणि काँग्रेसचं पुनर्गठन करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी UPAचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलं आहे. तसेच, UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत यांनी या मुलाखतीत UPAच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. UPAचं नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावं ज्यांना विरोधक स्वीकारतील, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसनं शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारावं’

संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला जर मजबूत व्हायचं असेल तर आणि UPAला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो नेता अॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल’. तेव्हा संजय राऊतांना असं कुठलं व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला असता आता तरी फक्त शरद पवार यांचंच नाव समोर येत आहे, असं म्हटलं. काँग्रेस नेत्यांनी ते नेतृत्व स्वीकारायला हवं. शरद पवार यांना UPAचा अध्यक्ष बनवल्यावर UPA अधिक मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्रातील प्रयोग उत्तम’- राऊत

संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की, UPAचं पुनर्गठन केलं पाहिजे’. संजय राऊत विचारण्यात आलं की, तुम्ही UPAचे घटक नाहीत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “आता आम्ही NDAतून बाहेर पडलो आहोत. अकाली दलही NDAतून बाहेर पडला आहे. ममता बॅनर्जीही UPA किंवा NDA मध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत जे NDA किंवा UPAचे घटक नाहीत. ते UPA मध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे”, असं राऊत यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Aprna

ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना,छोट्याश्या मुलीची सुप्रियाताई सुळेंना आर्त हाक

swarit

#Coronavirus : शेतकऱ्यांना दिलासा, राज्यात दररोज १० लाख लिटर दूधाची खरेदी २५  रुपये दराने करणार

swarit