HW News Marathi
महाराष्ट्र

स्वत: मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोन करतात !

पुणे | “स्वत: मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोन करतात”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार रविवारी (२८ जुलै) बोलत होते. पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या पक्षांतराबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत.

“विरोधी पक्षातील आमदारांना ईडीकडून धमकावले जात आहे. सत्ताधारी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. या फोडाफोडीसाठी भाजपकडून अनेक सहकारी संस्था, तसेच बँकांचाही गैरवापर होत आहे”,असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांनी यावेळी चित्रा वाघ यांचा राजीनामा, हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेले छापे, संग्राम जगताप यांच्या पक्षांतराच्या चर्चा अशा अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या होणार शस्त्रक्रिया

News Desk

राष्ट्रवादीचा विराट सभांचा विक्रम, आता कोकणावर स्वारी

News Desk

जाणून घ्या… मराठी पत्रकार दिन का साजरा केला जातो

Aprna