HW News Marathi
महाराष्ट्र

‘ते’ अन्य पक्षातून भाजपमध्ये स्वार्थासाठीच येतात, मात्र…!

मुंबई | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या एका मागून एक वारंवार विविध विधाने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये वाढलेल्या इनकमिंगबाबत एक वक्तव्य केले आहे. “जे लोक अन्य पक्षातून भाजपमध्ये येतात ते त्यांच्या स्वार्थासाठीच येतात. मात्र, त्यांचा स्वार्थ भल्यासाठी असतो”, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

“अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या लोकांचा त्यात वैयक्तिक स्वार्थ असतो. मात्र, हा स्वार्थ भल्याचा असतो. सत्ताधारी पक्षात राहिल्याने कामे होतात. लोकांच्या उपयोगी पडता येते. म्हणूनच सत्ताधारी पक्षासोबत जाण्याकडे त्या नेत्यांचा ओढा असतो. म्हणून अजूनही अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज धनगर समाजाचे पुण्यात आंदोलन

News Desk

“हा अंतर्गत धोका असावा”, आशिष शेलारांचा टोमणा

News Desk

ठाकरे सरकार आल्यापासून कोणावरही सुडाच्या भावनेने कारवाई नाही, अर्णब यांच्या अटकेवर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk