HW News Marathi
मनोरंजन

महिला दिन आणि विचार करायला लावणारे प्रश्न…!

आज 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. समाजातील असामान्य कर्तुत्ववान स्त्रियांचा यानिमित्ताने सन्मान होत आहे. मात्र महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ छान-छान संदेश पाठवणे, विविध कार्यक्रम घेणे म्हणजे झालं असं नाही.

प्रथम आपली हि संकुचित मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज महिला दिन आहे खरा पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी-कधी अनुत्तरीतच राहतात. असेच प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे आहेत…

  • ज्यांना खरंच मदतीची किंवा सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोहोचणार आहोत की नाही?
  • खेडं असो किंवा शहर सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आजही कायम आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल? याचा विचार व्हायला हवा.
  • प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणाऱ्या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तयार करणार आहोत की नाही?
  • महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मीडियाधून याची चर्चा होत असताना महिलादिनाची उपयुक्तता आणि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह उभे राहतात.
  • देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत. त्यांना विशेष मदत करायला हवी.
  • स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीच बिकट आहे. याउलट गुन्हेगार मात्र मोकाट फिरत असतात. या विषयाचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण विचार करायला हवा!
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk

चंदगडच्या साहित्यातील देव आणि शिल्पकार….

News Desk

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

News Desk
Uncategorized

मोबाइलवर 24 तास गेम खेळल्याने आले अंधत्व

News Desk

बीजिंग चीनमध्ये एका तरूणीने सतत 24 तास मोबाईलवर गेम खेळल्यामुळे डोल्याची दृष्टी गेली आहे. तीच्यावर सध्या सिटी रूग्णालयात रटिनल आर्टेरी ओक्लुजनचे उपचार सुरू आहे. तरूणीने सतत 24 तास अाॅनर अाॅफ किंग्ज’ ऑलनलाईन गेम खेळल्याने तीचा डोळा सुरूवातीला अंधुकसे दिसू लागले होते त्यानंतर पुर्ण पणे अंदत्व आली त्यानंतर एका डोळयाची दृष्टी गेली आहे. हा आजार वयस्कर लोकांना येतो. डोळ्यावर अत्याधिक दबाव किला जास्त जागृन केल्यास हा आजार होतो असा डॉक्टरचं म्हणनं आहे.

Related posts

Aprna

शशिकलाची 1400 कोटींची संपत्ती जप्त

News Desk

अमिरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

News Desk