HW News Marathi
Uncategorized

साता-यात २२  वर्षीय युवक कोरोना बाधित, २४ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा | जिल्हा रुग्णालयात ६ कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्यांपैकी एका २२ वर्षी युवक कोरोना (कोव्हीड -१९) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या ५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष २९ व महिला ४७ वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना वय वर्ष २१ ते २५ दोन पुरुष व एक महिला यांना कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

काल जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९ रुग्णाचे निकट सहवासीत म्हणून ४ ते ६८ वर्ष वयोगटातील १२ नागरिकांना (पुरुष-८ व महिला-४) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच २५ ते 8८५ वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज येथे २ ते ५४ वर्ष वयोगटातील चार पुरुष नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व २४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज (६ एप्रिल) एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी देवेंद्र फडणवीसांना विचारले मग कसे काय पाऊसपाणी ?

News Desk

हिंदूत्वाची व्याख्या संघाने बदलली

News Desk

पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ ; करणी सेनेची धमकी

News Desk