HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह, वरळी पोलीस कॅम्प सील

मुंबई | कोरोनाचा संसर्ग फैलाव देशात वेगाने होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सध्या २१ लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान २४ तास ऑनड्युटी असलेल्या पोलिसांचाही समावेश होऊ लागला आहे. मात्र, मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलला करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (२ एप्रिल) उघडकीस आली आहे. पोलिसांना आता कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली.

या पोलीस कॉन्स्टेबल १८ मार्च रोजी आपल्या एका मित्रासोबत लोणावळा येथे जमीन खरेदी करण्यासाठी गेला होता. यादरम्यान पोलीस दलातच कार्यरत असलेला त्याचा भाऊ सायन रुग्णालयात दाखल होता. मात्र, हा कॉन्स्टेबल आजारी पडल्याने त्याला १ एप्रिल रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस कॉस्टेबल करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पत्नी आणि दोन मुले यांचे वेगवेगळ्या रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्ण पोलीस कॉन्स्टेबल हा वरळी पोसी कॅम्पमध्ये राहत असून कॉन्स्टेबल राहत असलेली आणि आजूबाजूच्या काही इमारती सील करण्यात आल्या आहेत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं आज निलंबन?

News Desk

रावसाहेब दानवेंना लागली लॉटरी, थेट रेल्वे राज्य मंत्रीपद!

News Desk

“महानगर पालिकेच्या निवडणुकीत ओबीसीना आरक्षण नसल्याचं कारण महाविकास आघाडी” – खा.डॉ. प्रितम मुंडे

News Desk