HW News Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह,इतर कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला

मुंबई | कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतंच आहे. कोरोनाचे केंद्र सध्या मुंबई बनत चालले आहे. धारावीत एका डॉक्टरला कोरोनाची लागम झाल्याचे समोर आले होतेच तर दुसरीकडे बेस्टच्या एका कर्मचाऱ्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या वडाळा बस डेपोमध्ये ही व्यक्ती पुरवठा विभागात कार्यरत आहे. दरम्यान, या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चितेंची बाब म्हणजे या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आणखी कर्मचारी आले आहेत.

कामावर रुजू होण्याआधी काही दिवस हा कर्मचारी सुट्टीवर होता. त्यामुळे सुट्टीच्या दरम्यान तो कोणाच्या संपर्कात आला याचा शोध सुरु आहे. दरम्यान, तो राहत असलेल्या भागाला पोलिसांकडून सील करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सैराटला स्थान

News Desk

परळमध्ये पेट्रोलपंपच्या बाजूला आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल

Aprna

लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांचा गौरव

News Desk