मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३३८ वर येऊ पोहोचल आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमधील आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीला ओळखले जाते. या धारावीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ५२ वर्षांच्या रुग्ण धारावीमधील पालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळला. यामुळे सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
The 52-year-old man who tested positive had developed symptoms and was advised by BMC officials to get treatment. His condition is stable. His family members & 23 colleagues have been advised to quarantine: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) official https://t.co/Yp2CBrE91d
— ANI (@ANI) April 2, 2020
दरम्यान, धारावी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल (१ एप्रिल) ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाचा काल मृत्यू झाला आहे. यामुळे पालिकेने आणि पोलिसांनी खबदारीचा उपाय म्हणून धारावीती बालिगा नगर येथील ३०० फ्लॅट्स आणि ९० दुकाने सील करण्यात आील आहे. याव्यतिरिक्त ज्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला आहे. त्या भागातील आजारी नागरिकांची तपासणी सुरू आहे. संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. धारावीतील स्थानिक नागरिकांना पालिकेद्वारे जीवनावश्यक वस्तू परविल्या जात आहे.
नुकतेच ५२ वर्षांच्या व्यक्ती वरळीतील कोळवाड्यातील रहिवासी असून धारावीमध्ये पालिकेच्या वतीने सफाई करण्यासाठी पाठविले होते. या व्यक्तीच्या कुटुंबिय आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.