पुणे | निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये १०६ आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज (१ एप्रिल) दिली.
निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त. त्यात पुणे १३६, सातारा ५, सांगली ३, सोलापूर १७ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ व्यक्ती. ९४ जण क्वारंटाईन. स्त्राव नमूना अहवालानंतर पुढील कार्यवाही- पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर pic.twitter.com/nHottU4rRj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 1, 2020
डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३६, सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ व कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करतांना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त ७ व्यक्ती आहेत. १८२ पैकी १०६ जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७०, सातारा जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील १०६ जणांना ट्रेसिंग करुन त्यातील ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील ५१ व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील ५१ जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील १८२ जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.