HW News Marathi
देश / विदेश

कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना लागण होण्याची शक्यता

नवी दिल्ली | संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे.जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तींना देखील कोरोनाची बाधा झाली. आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुतिन यांनी डॉक्टरांशी हात मिळवला होता. मात्र, त्या डॉक्टरला कोरोना झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुतीन यांनी ज्या डाॅक्टरांशी हात मिळविला ते डॉक्टर मॉस्को येथील कोरोना रुग्णालयाचे प्रमुख आहेत. गेल्या आठवड्यात मंगळवारी (२४ मार्च) पुतीन यांनी डॉक्टर डेनिस प्रोत्सेनको यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकवच परिधान केलेले नव्हते. मात्र, काही वेळाने पुतीन आणि डॉक्टरांनी हात मिळवला होता.

दरम्यान, पुतीन यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते देमित्री पेस्कोव यांनी माध्यमांना सांगितले की, पुतीन यांची तपासणी सुरू असून त्यांच्या प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नाही. सर्वकाही ठीक आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या रशियात आतापर्यंत २३३७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहीद भगतसिंगांचं ते पिस्तुल 90 वर्षांनंतर जगासमोर

News Desk

मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, ममता बॅनर्जींची अनुपस्थिती

News Desk

Assembly Elections 2022 VotingLive Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत यूपीमध्ये ९.४५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के अन् गोव्यात ११.०४ टक्के मतदान

Aprna