HW News Marathi
देश / विदेश

“एक आदिवासी मुख्यमंत्री असल्यामुळे त्रास देत आहेत”, हेमंत सोरेन यांचा आरोप

मुंबई | “एक आदिवासी मुख्यमंत्री असल्यामुळे त्रास देत आहेत.”, असे आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) केले आहे. सोरेन यांना आज (3 नोव्हेंबर) ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहणे अपेक्षित होते. परंतु, सोरेन चौकशीसाठी न जाता ‘झारखंड मुक्ती मोर्चा’च्या एका सभेला संबोधित करत ईडी आणि भाजपवर हल्लाबोल केला.  सोरेन यांना साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने गुरुवारी (2 नोव्हेंबर) समन्स बजावला होता. यानुसार, सोरेन यांना आज  चौकाशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणे अपेक्षित होते.

सोरेन म्हणाले, “विरोधी पक्षात असलेल्या भाजपला झारखंडमधील सरकार पाडण्याचा कट रचला आहे. एक आदिवासी मुख्यमंत्री असल्यामुळे त्रास देत आहेत. मला एका तपास संस्थेने बोलावले आहे, पण मी घाबरणार नाही.”  मला त्रास देण्यामागे आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गडा आणणे हा त्यांचा उद्देश असून आमच्या पूर्वजांनी आम्हाला हरायला शिकवले नाही. त्यांनी आम्हाला लढायाला आणि जिंकायला शिवकले.”

यापूर्वी अवैध खाणकाम प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांना ईडीने अधीच अटक केली आहे. यानंतर ईडीने जुलै महिन्यात केलेल्या छापेमारीनंतर मिश्रा यांच्या खात्यातून 11 कोटी 88 लाखांची रक्कम  जप्त केली होती. यानंतर मिश्रांच्या निवासस्थानातून ईडीला पाच कोटी 34 लाखांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली होती.

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, लवकरच डेबिट कार्ड करणार बंद

swarit

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. के. धवन यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk

अन्यथा बंद होईल ATM कार्ड

News Desk