HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive: विमाच न घेतलेल्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला !

राज्यातील विधानसभा निवडणुक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे. राज्यातील बदलणारी समीकरणे, राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिका, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यामुळे आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू.मराठीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी खास बातचीत केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची राजू शेट्टी यांची भूमिका, गेल्या ५ वर्षांत त्यांच्या बदलत्या भूमिकेचा मतांवर पडलेला परिणाम, शिवसेनेचा पीक विमा मोर्चा, सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघाचे नवे खासदार धैर्यशील माने यासारख्या मुद्द्यांवर राजू शेट्टी यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी संवाद साधला आहे.

शिवसेनेचा पीकविमा मोर्चा म्हणजेच केवळ नौटंकीच !

शिवसेनेने १७ जुलै रोजी पीक विम्या कंपन्यांच्या मनमानीविरोधात मुंबईत धडक मोर्चा काढला होता. शिवसेनेच्या या मोर्चाविषयी प्रश्न विचारला असता, राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “शिवसेनेचा पीकविमा मोर्चा म्हणजेच केवळ नौटंकीच. त्या मोर्चात किती शेतकरी होते हे दुर्बीण लावून शोधावे लागले असेल. आता विधानसभेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. त्यामुळे, ‘आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करत आहोत आणि आम्हीच शेतकऱ्यांचे ‘तारणहार’ आहोत’ केवळ हेच दाखवून देण्यासाठी शिवसेनेने हा मोर्चा काढला होता”, असे म्हणत राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

२०१८ पासून एकाही शेतकऱ्याचा विमा न घेतलेल्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला !

“विमा कंपन्यांसोबत केलेला करार हा संघटितरित्या केंद्र आणि राज्य सरकारच्या पैशावर दरोडा टाकणारा आहे. सत्तेत असणारी शिवसेना तेव्हा काय झोप काढत होती काय ? ज्या कंपनीने २०१८ मध्ये एकाही शेतकऱ्याचा विमाच घेतलेला नाही अशा पीकविमा कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला. हे हास्यसपद आहे. शिवसेनेने किमान एवढा तरी गृहपाठ करायला हवा होता. ही सरळ सरळ नौटंकी आहे. शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत”, असेही राजू शेट्टी यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हटले आहे.

गेल्या २ वर्षांपासून पिकविम्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांची प्रचंड लूट !

“गेल्या २ वर्षांपासून सातत्याने पिकविम्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. तर याच काळात पिकविमाकंपन्यांनी तब्बल २५ हजार कोटींहून अधिक नफा कमवला आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर एकट्या मराठवाड्यात ८ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या या दुष्काळात जवळपास ८०-८५ गावांचा समावेश होतो. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तब्बल ६६ लाख शेतकऱ्यांनी पिकविम्यात भाग घेतला असताना त्यांपैकी केवळ ३०% शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी विम्याची रक्कम मिळाली आहे”, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.

पिकविमा कंपन्यांसोबतचा करार विमा कंपन्यांना ‘तारक’ आणि शेतकऱ्यांना ‘मारक’ !

“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना विमा कंपन्या दिवाळखोरीत जायला हव्या होत्या. कंगाल व्हायला हव्या होत्या. मात्र, जर त्याउलट त्या नफा कमवत असतील तर त्याचा अर्थ असा आहे कि सरकारने या विमा कंपन्यांसोबत जो करार केला होता त्या करारांमधील निकष, अटी, कलमे ही विमा कंपन्यांना ‘तारक’ आणि शेतकऱ्यांना ‘मारक’ ठरत आहेत. म्हणूनच त्यांना नफा कमावता आला आणि शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही”, असाही संतप्त आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष पदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती

News Desk

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

News Desk

महाविकासआघाडी सरकाराचा अधिवेशन आटोपण्याचा निर्धार!

Aprna