HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकाराचा अधिवेशन आटोपण्याचा निर्धार!

मुंबई | महाविकासआघाडी सरकार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपण्याचा निर्धार आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना ठाकरे सरकारवर केले आहे. राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (२४ डिसेंबर) कालावधी कमी असल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनात एचडब्ल्यू मराठीच्या पत्रकारांनी दरेकरांची मुलाखत घेतली. यावेळी दरेकरांनी एसटी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

दरेकर म्हणाले, “जोर जबरदस्तीने अधिवेशन आटपण्याचा त्यांचा निर्धार आहे. मुख्यमंत्री अधिवेशनातील अनुपस्थितीवरू भाजप आक्रमक असल्यामुळे ते असंवेदनशील असल्याचे म्हटले जाते. वस्तुस्थिती मानली की असंवेदनशीलता वाटते. गेले ५० दिवसापासून राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांचे दर्शन झाले नाही. आम्हाला आमच्या राज्याचे प्रमुख त्या ठिकाणी दिसत नाही. मग अशा वेळेला भूमिका मांडली. तर सत्ताधारी असंवेदनशील म्हणतात म्हणजे आश्चर्य, मुख्यमंत्री नाही ती वस्तू स्थिती आहे ना.”

एसटीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे मुद्दे, शक्त कायदा आणि अन्य जे राज्यातील म्हत्वाचे मुद्दे या अधिवेशनात पूर्ण होती का? या प्रश्नावर दरेकर म्हणाले, “चार दिवसात विधेयक प्रस्ताव, ठराव, प्रशासकीय कामकाज हे पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे १५ दिवसांचे अधिवेशन असेत तर आपल्याला सगळे विषय हाताळता आले असते. पण सरकारला चर्चा नको, सरकार चर्चेपासून पळ काढते. त्यामुळे अनेक विषय रहणार आहेत.”

मंत्र्याला आलेल्या धमकीची सखोल चौकशी झाली पाहिजे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी आलेल्या मुद्द्यावर ते म्हणाले, “देवेंद्रजींनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे हे राज्यातील तरुण नेते आहेत. हे पक्षिय राजकारण नाही. ते मंत्री असून एखाद्या मंत्र्याला आलेल्या धमकीची सखोल चौकशी करून सबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी आपण मतभेद करू शकत नाही. धमकी कोणाला आली तर वाईट आहे ना. ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग पाहात पाच राज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी अलाबाद न्यायालयाने केले यावर दरेकर म्हणाले, “ओमायक्रॉनची जर भीती असेल तर शासन तशा प्रकारचा निर्णय घेईल. त्यातील सत्य आणि तथ्य पडताळून प्रादुर्भाव पाहून आयोग्याच्या दृष्टीने निर्णय घेतला तर काही चुकीचे होणार नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातल्या समारंभात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा!

News Desk

काश्मीरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या

News Desk

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही चूकचं! हे सांगणारा मी पहिला होतो – संजय राऊत

News Desk