पालघर | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. मुंबईत १६ आणि पुण्यात २ अशा नव्या कोरोना रुग्णांची नोंद काल (३१ मार्च) झाली असून आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यातील मृतकांचा आकडाही वाढत आहे. पालघर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा पालघरमधील पहिला तर राज्यातील १२ वा बळी आहे. यामुळे पाघरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
A 50-year-old #COVID19 positive patient has passed away in Palghar, Maharashtra. He was admitted to a hospital since March 28: Palghar District Hospital.
— ANI (@ANI) March 31, 2020
मुंबईत ८, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे बारा जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे. हा ५० वर्षीय मृत व्यक्ती पालघर जिल्ह्यातील सफाळेमधील उसरणीचा मुळ रहिवासी असून हा व्यक्ती राहत असलेल्या पोलिसांनी सील केले आहे. या व्यक्तीला सुरुवतीला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी सफाळे येथील २८ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसल्याने त्यांच्यावर तात्पुरता उपचार करू त्याला ‘होम क्वारेन्टाईन’मध्ये ठेवण्यात आले होते. या मृत व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या सर्व त्याच्या नातेवाईकांचे चाचणीसाठी नमुने घेतले असून तपासणीसाठी पालिकेत आतापर्यंत ७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
राज्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या
- मुंबई – ८
- नवी मुंबई – १
- पुणे १
- बुलडाणा – १
- पालघर १
एकूण – १२
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.