HW News Marathi
देश / विदेश

राज्यातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा ३२१, नव्या १९ रुग्णांची नोंद

मुंबई | राज्यातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा ३२१ वर पोहोचला आहे. कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याने आज (१ एप्रिल) राज्यात १९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील या १९ नव्या रुग्णांपैकी १६ रुग्ण हे मुंबईतील, २ रुग्ण पुण्यातील, तर १ रुग्ण बुलढाण्यातील आहे. बुलढाण्यात आज आणखी १ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. तर जिल्ह्यातील अजून ८ चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. फक्त मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता १६७ झाला आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा आकडा १२ झाला आहे. मुंबईतील हा कोरोनामुळे झालेला हा आठवा मृत्यू आहे. मुंबई १ आणि पालघरमध्ये १ कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. मुंबईतील हा आठवा बळी आहे. आतापर्यंत मुंबईत ८, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. मुंबईत ७५ वर्षीय वृद्धाचा तर पालघरमध्येही ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आज नव्या १९ रुग्णांची नोंद

मुंबई – १६

पुणे – २

बुलढाणा – १

राज्यात १२ ‘कोरोनाग्रस्तां’चा मृत्यू

मुंबईत ८

नवी मुंबई १

पुणे १

पालघर १

बुलडाण्यात १

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन : पाकच्या २ सैनिकांचा खात्मा तर १ जवान शहीद

News Desk

पर्रिकरांची सुरक्षा वाढावा गोवा काँग्रेसच राष्ट्रपतींना पत्र

News Desk

शबरीमाला हिंसाचार प्रकरणी २,०६१ जणांना अटक

swarit