HW News Marathi
महाराष्ट्र

आतापर्यंत माझी दोस्ती बघितली; पण आता दुश्‍मनीही बघावी लागेल : वसंत मोरे

पुणे | महापालिकेच्या सभेत दहा कोटी रुपयांच्या प्रस्तावावरुन सत्ताधारी भारतीय पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. “माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत. नाही तर, आतापर्यंत वसंत मोरे यांची दोस्ती बघितली, पण आता दुश्‍मनीही बघावी लागेल,” वसंत मोरे यांनी असा दम भरला आहे.

महापालिका हद्दीबाहेर मांगडेवाडी, भिलारेवाडी, निंबाळकरवाडी आणि कात्रज तलावात येणारे मैलापाणी रोखण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव मनिषा कदम यांनी मांडला होता. हा प्रस्ताव पालिकेच्या हद्दीबाहेरील मंजूरी होण्यावर प्रश्न चिन्ह उभी राहिली होती. या प्रस्तावर चर्चा दरम्यान मोरे आणि मनिषा कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते.

दीड महिन्यांपूर्वी प्रस्ताव सभेत आला तेव्हा कात्रज तलावाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत हद्दीबाहेरील गावांना एवढा निधी देण्यास मोरे यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रस्तावावर मतदान झाले. त्यावेळी मोरेंनी विरोधात तर,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

पालिका सभागृहात पुन्हा हा प्रस्ताव लोकांच्या मागणीनुसार मांडण्यात आला. मात्र, ‘काही मंडळी राजकीय द्वेषापोटी कामात खोडा घालत आहेत. कामे अडविण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न ते करीत आहेत. ते योग्य नाही,’ अशा शब्दांत नगरसेविका मनिषा कदम यांनी मोरेंवर हल्ला केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गडकरींच्या गावात भाजपचा पराभव ही आगामी पराभवाची नांदी !

swarit

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त! – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

Aprna

थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…!, भाजपने पुन्हा साधला निशाणा

News Desk
व्हिडीओ

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk

आपण नक्की कितपत सुरक्षित आहोत ? आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का? तुमच्या आमच्यासारख्या मुंबईकरांच्या रोजच्या जीवनात धावपळ हा फक्त शब्द राहिला नसून आयुष्य जगण्याची एक पद्धत बनला आहे. हि धावपळ करताना आपण अनेक वाहतुकीच्या अनेक साधनांचा उपयोग करतो त्यापैकी प्रवासासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी आणि वेळ वाचवणारी म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन.

हि लोकल ट्रेन आपल्याला सुरक्षितपणे आपल्या स्थानकांपर्यंत पोहचवेल अशी प्रवांशांची अपेक्षा असते. पण अशा काही घटना समोर येतात कि आपल्याला प्रश्न करायला भाग पाडतात.

अशावेळी काही महत्वपूर्ण प्रश्नानी तुमच्या मनात नक्कीच घर केले असेल,जसे की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आपण सुरक्षिततेचा विचार केव्हा करणार, ही सुरक्षितता फक्त रेल्वे सुरक्षा दलाची जबाबदारी आहे का ? आणि अशावेळी रेल्वेच्या आपत्कालीन चैन कितपत प्रभावी असतात, त्याचबरोबर

दोन स्थानकांच्यामध्ये घडलेला हा प्रसंग त्या महिलेसाठी जीवघेणा ठरू शकला असता, अशावेळी प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ?

या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी जितके रेल्वे मंत्री पियुष गोयल बांधील आहेत तितकेच तुमच्या आमच्यासारखे सामान्य प्रवासीही हे प्रश्न उचलून धरण्यासाठी जबाबदार आहेत. तुमची सुरक्षा हि तुमच्याच हातात आहे, हे लक्षात घ्या आणि तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर आम्हाला संपर्क करा.

Related posts

Sambhajiraje Exclusive | इतिहास गाडू नका ..संभाजीराजे आक्रमक!

Arati More

Raj Thackeray यांना आव्हान देणाऱ्या Brijbhushan Singh यांच्या Pune दौऱ्याला MNSचा विरोध का नाही?

Manasi Devkar

CM तयारी नसतानाही ग्रामपंचायतीत आमचा विजय! – Eknath Shinde

News Desk