HW News Marathi
Uncategorized

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांची नावे आताच जाहीर करण्यात मजा नाही, असे म्हणत भाजप नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आमदारांची नावे अद्याप गुप्त ठेवली आहेत. . या पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “ह्या सर्व फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. असे काहीही होणार नाही”, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर देखील सडकून टीका केली आहे. “लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचलेला असताना कनिष्ठांनी काम कसे करायचे ?”, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.#ChandrakantPatil #BalsahebThorat #Congress #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच हजार शिक्षक कोर्टात जाणार

News Desk

माझा मुलगा निर्दोष आहे, प्रद्युम्न हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवलं जातंय

News Desk

लाइव्ह करणाऱ्या कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, पोलिसांनी त्वरित घेतली अॅक्शन

Manasi Devkar