देशात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शेतकरी आत्महत्येवर गाजणार असच दिसत आहे. राज्यातील नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांना वाचा फोडली.नवनीत राणा म्हणाल्या की, शहरांना बाजुला ठेवून ग्रामीण महाराष्ट्रावर आपण चर्चा करूया. एकेकाळी महाराष्ट्राची ओळख वेगळी होती. परंतु, आता महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. देशात मागील ४० वर्षांत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. यापैकी ८० हजार शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. #NavneetRana #Loksabha2019 #NCP #Amravati
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.