HW News Marathi
देश / विदेश

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेत आज निकाल

हेग (नेदरलॅण्ड्स) । हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड्समधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज (१८ जुलै) निर्णय देणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता हा निर्णय येणार आहे. या निकालाकडे भारत आणि पाकिस्तानचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. भारताने पाकिस्तानच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच, आपला निर्णय राखून ठेवला होता.

कुलभूषण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ३ मार्च २०१६ रोजी गुप्तहेर आणि दहशतवादाच्या आरोपात बलुचिस्तानमधून अटक केली होती, असा दावा पाकिस्तान केला आहे. मात्र भारताने वारंवार हा दावा फेटाळला आहे. कुलभूषण जाधव निवृत्ती घेऊन बिझनेच्या निमित्ताने इराणला गेले होते. तिथे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले होते, असा दावा भारताने केला आहे. आहे.

 

.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा पाऊस ९६ ते १०० टक्के होणार, हवामान विभागाचा अंदाज

News Desk

भारतीय सैन्याने आपली ताकद काय असते हे दाखवून दिले | मुख्यमंत्री फडणवीस

News Desk

भगतसिंग यांच्या विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk