HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | ‘कोरोना’शी लढण्यासाठी टाटांकडून आणखी १००० कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली | ‘कोरोना’विरुद्ध लढाईत प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहे. देशातील राजकीय नेते, धार्मिक संस्था, कलाकार मंडळी, स्वयंसेवी संस्था, उद्योगपती आपापल्यापरीने हातभार लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शनिवारी (२८ मार्च) टाटा समूहाने कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी तब्बल ५०० कोटींचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता टाटा सन्सकडून ही रक्कम १००० कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाटा एकूण १५०० कोटींची मदत करणार आहेत.

१५०० कोटींच्या आर्थिक मदतीसह आवश्यक असा व्हेंटिलेटर्सचा पुरवठा, त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे देखील टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योगपती अशी टाटांची ओळख राहिली आहे. देश अशा कठीण परिस्थितीचा सामना करत असताना सर्व स्तरांतून होणारी हि आर्थिक मदत स्वागतार्ह आणि अत्यंत आवश्यक आहे.

कोरोनामुळे देशासह जगभरात उद्भवलेली स्थिती अत्यंत चिंताजनक असून कोरोनावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांना आम्ही बळ देत राहू, असा विश्वास देखील टाटा सन्सकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाची लढाई समर्थपणे लढण्यासाठी बीसीसीआयने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला

News Desk

केंद्राच्या सूचनेनंतर युट्युबने कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओज हटविले

News Desk

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk