शिमला | हिमाचल प्रदेशमध्ये चार मजली इमारत कोसळली. ही दुर्घटना सोलन जिल्ह्यातील कुमारहट्टी येथे घडली असून या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू आहेत. मृत झालेल्या १३ जणांपैकी १२ जण हे जवान होते तर हे स्थानिक रहिवासी होता. तर २३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० जवानांचा समावेश असून मृताच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून (एनडीआरएफ) बचावकार्य सुरू आहे.
Solan: Death toll rises to 13 (12 Army personnel & 1 civilian) in Kumarhatti building collapse. 1 Army man still trapped in debris. #HimachalPradesh https://t.co/eqZ0FBbu3E
— ANI (@ANI) July 15, 2019
नाहन-कुमारहट्टी मार्गावरील ही चार मजली इमारत पावसामुळे कोसळली. या इमारतीत रेस्टॉरंट देखील होते.या दुर्घटनेत ३७ लोक अडकले आहेत. आतापर्यंत २३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अनेक जण या गंभीर जखमींवरर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून घटनेची चौकशी केली जाईल. येत्या काही तासात हे बचाव कार्य संपेल असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.