HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने ठेवू नका, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे यांनी आज (२७ मार्च) फेसबुक लाईव्हच्या राज्यातील जनतेशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापैंकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, अशी माहिती दिली. तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३५ वर गेला आहे.

तसेच संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केले आहे. कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू साहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदी सूचनांचे पालन करून रक्तदान शिबिरे घ्या,रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.ही शिबिरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण करावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कोरोना रुग्ण बरे होतात

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत असून आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यांनी येथे दिली. दरम्यान, काल (२६ मार्च) पुण्यात दोन कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये मंदिर उघडण्यासाठी शंखनाद करत केले अनोखं आंदोलन!

News Desk

हिंदुत्त्वावर शिंतोडे उडविणाऱ्या ‘त्या’ युवकावर कारवाई होत नाही, हा आश्चर्यजनक ! फडणवीस आक्रमक

News Desk

शेतकऱ्याची विटंबना मीच काय कोणीच करू शकत नाही, ‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंचा युटर्न

News Desk