HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये मंदिर उघडण्यासाठी शंखनाद करत केले अनोखं आंदोलन!

बीड। सरकार चे निर्बंध आता पाळणार नाही,बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले मग मंदिर बंद का असा सवाल करत आज बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंख नाद आंदोलन करत बीड जिल्ह्यातील परळी येथिल बारा जोतिर्लिंग पैकी 5 व्या स्थानावर असलेले वैधनाथ मंदिर तर बीड येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला तसेच आज पासून सरकारचे नियम पाळणार नाही आज पासून भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील असा निर्णय घेण्यात आला.उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही असा पवित्रा भारतीय जनता पार्टी च्या वतीने घेण्यात आला.राज्य सरकार इकडे बियर बार हॉटेल चालू करण्यास परवानगी देत असताना मंदिर बंद का?असा प्रश्न उपस्थित करत उद्धवा अजब तुझे सरकार च्या घोषणा देत..मंदिराचे कुलूप उघडून दर्शनासाठी खुले करण्यात आले.

सरकार आमच्या श्रद्धेच्या आड येऊ शकत नाही

सरकार चे निर्बंध आता पाळणार नाही असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बोलून दाखवला तसेच सरकार आमच्या श्रद्धेच्या आड येऊ शकत नाही पवित्र श्रावण महिन्यात मंदिर बंद होते आता उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला

राज्यभरात भाजपाकडून घंटानाद आणि शंखनाद

राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी नाशिकमध्ये ही निदर्शनं झाली. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आले, यावेळी साधू महंतांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिराबाहेर जन्माष्टमीचा मुहूर्त साधत भाजपने मंदिरं उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. लोकांच्या धार्मिक भावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंदिरं उघडावीत, अशी मागणी केली.

मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

यासोबतच मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यभरात भाजपाकडून घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केले जात आहे. औरंगाादमध्येही शहर भाजप आघाडीच्या वतीने शहरातील मध्यवर्ती भागातील गजानन मंदिर परिसरात शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी पोलीस विकतायंत तिकिटे

News Desk

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणा दाम्पत्यांचे सर्व प्रकार सुरू, बच्चू कडूंची टीका

Aprna

यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

Aprna