हैदराबाद | कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २१ दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या लॉकडाऊन घोषणा केल्यानंतर सर्वसामान्य नागरिक घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन ही त्यांनी केले होते. लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर मग संचारबंदी लागू करून दिसताक्षणी गोळी मारण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे वादग्रस्त विधान तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रेशेखर राव यांनी काल (२४ मार्च) केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राव यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
In US,Army had to be called in to enforce lockdown.If people don't follow #CoronavirusLockdown,a situation may arise where we'll have to impose 24-hour curfew & issue shoot-at-sight orders.I urge people not to let such a situation arise:Telangana CM K Chandrashekar Rao (24.03.20) pic.twitter.com/he7KpLYrOb
— ANI (@ANI) March 24, 2020
राव म्हणाले की, तेलंगणामधील जनतेने लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन केले नाही, तर मला २४ तासांसाठी संचारबंदी लागू करावी लागेल. त्यानंतर मला तेलंगाणामध्ये सैन्य दलाला बोलवावे लागेल आणि लोकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. लोकांनी अशी परिस्थिती उद्भवू देऊ नये म्हणून आवाहन, वजा धमकीचा इशारा राव यांनी तेलंगणा राज्यातील जनतेला दिला आहे.
लोकांनी रस्त्यावर येऊ नये, यासाठी पेट्रोलपंप बंद करण्याबरोबरच लष्कराचीही मदत घेण्याचा विचार सरकार करत असल्याचे राव यांनी सांगतिले. राव पुढे म्हणाले की, राव यांनी तेलंगणामध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. संध्याकाळी ६ वाजता दुकाने बंद झालीच पाहिजेत, असे त्यांनी आदेश दिले आहेत. जर तरीही लोके ऐकली नाही तर मला २४ तासांच्या कर्फ्यूचे आदेश जारी करावे लागतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.