HW News Marathi
महाराष्ट्र

आता नागपूर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास

नागपूर | नागपूर विद्यापीठाने नुकतेच नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच संघाबाबत माहिती नमूद करण्यात आली. नागपूर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. पदवी दुसऱ्या वर्षाच्या भारताचा इतिहास १८८५ ते १९४७ या कालखंडाच्या तिसऱ्या घटकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ची राष्ट्रनिर्माणातील भूमिका या विषयाचा समावेश केला आहे.

या विषयात संघ स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात झालेल्या विविध घटना, घडामोडी यांचा उल्लेख अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. संघाने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला नसल्याचे राजकीय स्तरावर अनेक आरोप करण्यात आला आहेत. मात्र, या आरोपांना उत्तर म्हणून अभ्यासक्रमातच संघाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका हा विषय आणण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र विद्यापीठाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय पातळीवर पुन्हा संघावर निशाणा साधण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपण आजपर्यंत अनेक संघटनांच्या इतिहासाची माहिती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थापर्यंत पोहचवली आहे. संघाचा इतिहासही विद्यार्थ्यांना कळावा या उद्देशाने अभ्यास मंडळाने निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही शरजील सोबत आहोत”, एल्गार परिषद शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna

औरंगाबाद पदवीधरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk