HW News Marathi
महाराष्ट्र

बाबरी मशीद, राम मंदिर वाद जमीनिसाठी- सुप्रीम कोर्टाचा सर्व राजकीय पक्षांना दणका

नवी दिल्ली | संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून असलेल्या बाबरी मशीद प्रकारणाची गुरूवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. एखाद्या जमीनीच्या वादाप्रमाणे या खटल्याकडे पाहाणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे या मुदयाचे भांडवल करून राजकरण करणाऱ्या नेत्यांना कोर्टाने दणका दिला आहे‌‌, पुढील सुनावणी 14 मार्चला होणार आहे.
राममंदिर आणि बाबरी मशीद वाद देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा आहे.सरन्यायाधीश दीपक मिश्रा,न्यायमूर्ती अशोक भूषण व अब्दुल नजीर यांच्या विशेष न्यायपीठाने सुनावणी केली.यापुढील तारखा निश्चित होणार आहेत.या आधी दोनदा खटल्यासंबंधीच्या 19519 दस्तऐवजांचा अनुवाद न झाल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.आता यापुढे सुनावणी लांबणार नाही,असे गेल्या वेळी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते.
अयोध्या वादावर सर्व पक्षकारांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांच्या अनुवादित प्रती दिल्या आहेत.ते बाजू मांडण्यास सज्ज आहेत.या अंतिम लढाईत राम मंदिराच्या समर्थनार्थ आलेल्या पक्षकारांचे म्हणणे आहे की,अलाहाबाद हायकोर्टाने 90 सुनावण्यांतच निकाल दिला होता.आता सुप्रीम कोर्टात 50 सुनावण्यांतच निकाल देईल.मात्र,बाबरी मशिदीशी संबंधित पक्षकार तसे मानत नाहीत.त्यांच्या मते,खटल्यात कागदपत्रांचा ढीग आहे.त्या सर्वांवर प्रत्येक मुद्द्यावर युक्तिवाद होईल.हिंदू महासभेचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की,हिंदी,उर्दू,पाली,संस्कृत,अरबीसह 7 भाषांत अनुवादित कागदपत्रे जमा झाली आहेत.
विलंब-7 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात वाद प्रलंबित
अयोध्या वाद सुप्रीम कोर्टात 7 वर्षांपासून प्रलंबित आहे.अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालावर 12 पेक्षा जास्त याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या.कोर्टाने सुब्रमण्यम स्वामींना 2016 मध्ये पक्षकार केले.स्वामींनुसार,इस्लामिक देशांत सार्वजनिक स्थळांवरून मशीद हटवली जाऊ शकते.
प्रकरण-3 समान भागांत जमीन वाटण्याचा होता आदेश
वादग्रस्त जमिनीवर कोणाचा हक्क आहे?यावर अलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये निकाल दिला होता.वादग्रस्त जमीन ३ समान भागांत वाटावी;रामलला मूर्तीच्या स्थानी रामलला विराजमान यांना,सीता रसोई व राम चबुतरा निर्मोही आखाड्याला,उर्वरित सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावी,असे म्हटले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस ३० जानेवारीला नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’  पुरस्कार देणार!

News Desk

राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या १० वर, नागरिकांनी घाबरू नये !

swarit

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण !

News Desk
देश / विदेश

राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिमांचा हातभार

swarit

राम मंदिरासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येत मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी फौजदारी खटल्यासह दिवाणी खटलाही चालला होता. यानंतर संपूर्ण देशात हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या होत्या. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी मशीदवरुन गलिच्छ राजकार केले. या मुद्दावरुन राजकीय नेत्यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली होती. पण, काही मुस्लिम समाजातील लोकांनी ही दर भरुन काढण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले आहेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 30 डिसेंबर 2010 ला मालकीप्रकरणी निर्णय दिला होता. वादग्रस्त जमिनीचे वाटप समान तीन भागांत करावे, असा निर्णय हाय कोर्टाने दिला होता. रामलल्लाची मूर्ती असलेले ठिकाण रामलल्लासाठी द्यावे. उर्वरित एक तृतीयांश जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला दिली जावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले.

या जागेवर मंदिर बांधण्यास मुस्लिम समाजाने समर्थन केले आहे. जेणे करुन संपूर्ण देशात हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाद कायमचा संपेल असे मत उत्तर प्रदेश शिया सेंट्रल कफ बोर्डचे अध्यक्ष वसीम रुझवी यांनी व्यक्त केली.

हिंदू आणि मुस्लिमांमधील दुरावा दूर करण्यासाठी आमची संघटना काम करत असल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख मोहम्मद अफजल यांनी म्हटले आहे.

तसेच गेल्या वर्षी कश्मीरमधून आलेल्या काही मुस्लिम समुदायांनी अयोध्येतील संतांशी भेट घेऊन या जागेवर राम मंदिर उभारण्यांचे समर्थन करुन या वादावर पडता पडण्यासाठी प्रयत्न केला होता.

या जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी अनेक मुस्लिम संघटनांनी समर्थन केले आहे. पण, या देशात हिंदू-मुस्लिम ऐक्य होऊ नये म्हणून काही समाजकंटक या मुद्द्यावरुन सतत राजकारण करुन आपली राजकीय पोळी भाजून लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण पसरवण्याचे काम करत आहे. देशा स्वतंत्र मिळवण्यासाठी जात-धर्म विसरुन लोक एकत्र आल्यानंतरच भारताला स्वतंत्र मिळाले होते. तसेच जोपर्यंत हिंदू-मुस्लिम लोक एकत्र येऊन आपली दाकत दाखवत नाहीत. तोपर्यंत नेते मंडळी समाजात धार्मिक विष पेरतच राहणार आहेत.

Related posts

पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ विधेयकाला मंजुरी

swarit

मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी नियुक्ती, राज ठाकरेंची पोस्ट

News Desk

अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही, पण…! – जो बायडेन

Aprna