मुंबई | राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि एमएमआरडीए या शहरांमधील अन्नधान, दूध, मेडिकल यासारख्या जीवनावश्यक वगळता सर्व कार्यालय आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२० मार्च) सोशल मीडियाद्वारे राज्यातील संबोधित महत्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यावर येऊन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती सांगितली.
Maharashtra CM Uddhav Thackeray: State government has ordered complete shutdown in Mumbai Metropolitan Region, except essential services and public transport. This is not a holiday, avoid crowding. Banks to remain open in the state. #Coronavirus https://t.co/NTC2Lcps9a
— ANI (@ANI) March 20, 2020
बंददरम्यान, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील बँका सुरूच राहतील. या शहरातील सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे. तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच ‘ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका’, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.
“गर्दी कमी करण्याच्या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसात मिळतोय. मात्र, लोकल ट्रेन आणि बस सेवा तुर्तास बंद न करण्याचा निर्णय मुख्ममंत्र्यांनी केला आहे. या सेवा मुंबईच्या जीवन वाहिन्या असून या सेवा बंद केल्या तर आपल्या अत्यावश्यक सेवा खोळंबतील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. “
कोरोनाविषय जनजागृती करणार व्हिडिओ
रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कोरोनाविषयक चित्रपट मुख्यमंत्री कार्यालय ट्वीटरवर शेअर केला, जरूर पहा. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयुषमान खुराणा, आलिया भट, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनी योगदान दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनापासुन बचावासाठी हे करा ,हे करू नका..डॉ.तात्याराव लहाने
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.