HW News Marathi
महाराष्ट्र

आता ग्रामीण जनतेला गाजर

मुंबई | मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागल्याची खोचक टीका शिवसेनेने केली आहे. अर्थमंत्री जेटली यांनी जुन्याच योजना नव्याने सांगून देशाची दिशाभूल केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

गेल्या तीन साडेतीन वर्षांमध्ये केवळ शहरी भागातील जनतेला दिवास्वप्न दाखवून झाल्यानंतर सरकारला ग्रामीण भागातील जनतेची कणव आल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ग्रामीण भागातील जनतेवर आश्वासनांची खैरात केली आहे. परंतु ग्रामीण भागातील जनता मरणपंथाला टेकल्यानंतर सरकारला त्यांच्या अस्तित्वाची जाण झाली हे ही नसे थोडके असे सामनामध्ये म्हटले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या काही बाबी अर्थसंकल्पात आहेत. परंतु त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. शेतमालाला दीडपट हमी भाव देण्याची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. परंतु हमीभाव कसा देणार हे स्पष्ट केलेले नाही. एकूणच या सरकारने नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पातून फेकाफेकी केल्याचे दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न! – वर्षा गायकवाड

Aprna

“अनिल देशमुखांप्रमाणेच मलाही अडकवण्याचं षड्यंत्र” – नवाब मलिक

News Desk

TRP घोटाळा – रिपब्लिक चॅनलच्या ३ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

News Desk