HW News Marathi
देश / विदेश

राहुलसारखा निर्णय घ्यायला धाडस लागते !

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या काही जेष्ठ नेत्यांनी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा राहुल यांना राजीनामा देऊ नये म्हणून मागणी लावून धरली होती. मात्र, राहुल आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. अशातच त्यांनी काल (३ जुलै) त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुनही अध्यक्षपद हटवले आणि आता खासदार असल्याचे नमुद केले आहे.

राहुल गांधी यांच्या या निर्णयाला काँग्रेस नेत्या आणि बहिण प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. राहुलचा हा निर्णय धाडसी असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. असा निर्णय घ्यायला धाडस आणि धैर्य लागत आणि माझा या निर्णयाला पुर्ण पाठिंबा आहे, असे एक ट्विट प्रियंका यांनी केले आहे.

आतापर्यंत प्रत्‍येक निर्णयात प्रियांका गांधी या राहुल गांधींच्‍या पाठिशी खंबीरपणे उभ्‍या राहिल्‍या आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील अमेठीत राहुल यांचा प्रचार करण्‍यास प्रियांकांनी चांगलीच कंबर कसली होती. आता राहुल यांच्‍या राजीनामा देण्‍याच्‍या निर्णयाला देखील त्‍यांनी पाठिंबा दिला आहे. राहुल यांच्याप्रमाणेच प्रियंका यांनीही पक्षातील इतर नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.

परंतु, राहुल यांनी काल ट्विटरवर त्यांचा ४ पानी राजीनामा शेअर केला. राजीनाम्यावर ठाम असल्याचे राहुल यांनी ट्विटमधून पुन्हा एकदा स्पष्ट केले. मात्र, अद्याप काँग्रेसने नव्या अध्यक्षांची निवड केलेली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू आहे. काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

गेल्या २८ दिवसांमध्ये देशातील १५ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला ‘या’ विरोधी पक्षांचा बहिष्कार

Aprna