HW News Marathi
मुंबई

ऑटिझम मुलांसाठी उपचार आणि मार्गदर्शन

मुंबई | तुम्हाला बर्फी सिनेमातली प्रियांका चौप्राने साकारलेली भूमिका आठवते ना! आपल्या सर्वांनाच अनेकदा चित्रपटात साकारलेल्या भूमिका लगेच लक्षात राहतात. आत्ममग्नता म्हणजेच ऑटिझम या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांकडे बघण्याचा समाजाचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन तितकासा चांगला नाही. आशा मुलांसाठी वेदीक्युअर वेलनेस चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजता मोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते.

सर्व साधारणत: वयाच्या तिसऱ्या वर्षी ऑटिझम या आजाराची लक्षणं दिसू लागतात. अनेकदा या आजाराचे समुळ सकट उच्चाटन होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. असाच एक उपक्रम जोगेश्वरीतील सोपान महापालिकेच्या शाळेत वेदिक्युअर वेलनेस चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोसायटी ऑफ चिल्ड्रन विथ ऑटिझम डिसऑर्डस्च्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यासाठी मोफत तपासणी शिबीर घेण्यात आले होते. यामध्ये डॉ अनिल पाटील यांच्या तज्ञ डॉक्टरानी विद्यार्थ्यांना तपासले असून या शिबिरादरम्यान त्यांच्या पालकांनाही संयुक्त उपचार पद्धतीचं मार्गदर्शन देखील करण्यात आले. यात काही तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थी आणि पालक यांना कशापद्धतीने उपचार केले जाऊ शकतात याचं मार्गदर्शन करण्यात आलं.

यावेळी श्री डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये रोगाचं निदान कशापद्धतीने करता येऊ शकते. तसंच रुग्णाला नेमका कोणता आजार झाला आहे? त्याला लवकरात लवकर कसा आराम मिळेल. यासाठी सर्व उपचार पद्धतींचा योग्य वापर करुन त्यावरील निवडक उपचार रुग्णांवर संयुक्त उपचार पद्धतीने कसे उपचार केले जातील अशा प्रकारचे मार्गदर्शन या कार्यक्रमादरम्यान पालक आणि विद्यार्थी यांना करण्यात आले आहे.

 

ऑटिझमवरील उपचार –

  • चित्रांच्या सहाय्याने शब्द उच्चारायला शिकवावे.
  • मुलांना इतरत्र मिसळू द्यावे
  • पालकांनी हळूहळू या मुलांना समाजात कसे वावरावे याचं मार्गदर्शन करावे.
  • खूप चांगले वागणे
  • सशक्तीकरणावर भर द्यावी
  • मानसिक उपचार देणे
  • सतत डॉक्टरांचा सल्ला घेणे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरेगावमध्ये इमारत कोसळून १ मृत्यू, ८ जण जखमी

News Desk

दादर स्थानकाचे चैत्यभूमी नामांतर झालेच पाहिजे | दलित युथ पॅंथर

News Desk

नो पार्किंग गाड्यांवर कारवाई करण्यासाठी ‘बाईक पे चर्चा’

News Desk